उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे केंद्र सरकार मधील मंत्र्याचा मुलांने गाडीने ४ शेतकऱ्यांना जागेवर चिरडले व काही शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले. त्या शहीद शेतकऱ्यांना मुरबाड मधील हुतात्मा स्तंभ येथे मेणबत्ती लावुन जयराम (आप्पा पडवळ), रविंद्र चंदने, चेतनसिंह पवार ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी समन्वय समितीच्यावतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. अनिल चिराटे, अर्जुन पष्टे, नेताजी लाटे, जयवंत हरड, अमोल चोरघे, दिलीप शेळके, निखिल चंदने, अंकुश धुमाळ आदी जागृत नागरिक उपस्थित होते. ब्रिटिशांना ह्या देशातील नागरिकांनी महात्मा गांधीचा अहिंसेच्या व तथागत गौतम बुध्दांच्या शांततेच्या मार्गाने हद्दपार केले होते परंतु हे आधुनिक जनरल डायर योगी-मोदी सरकारला देखील हद्दपार करण्याची वेळ आली असल्याचे रविंद्र चंदने यांनी मत व्यक्त केले. लखीमपुर खेरी येथील घटनेबद्दल उत्तर प्रदेशातील योगी-मोदीचे राज्य सरकार बरखास्त करा व गुन्हेगारांना फाशी ची शिक्षेबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी भावना चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केली तर जयराम पडवळ यांनी सदरील आंदोलनाची पार्श्वभुमी उपस्थितांना सांगितली. सदरील घटनेमध्ये शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना यावेळी श्रध्दांजली सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.