कोंढापुरी येथील शेतकरी विजय ढमढेरे यांना विद्यूत वितरण कंपनी उर्जा विभागाकडून सन्मानपत्र
-----------------
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांना महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी उर्जा विभागाकडून सन्मानपत्र देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मध्ये एक जागरूक नागरिक म्हणून सहभागी होवून कृषी पंप ग्राहक सप्टेंबर २०२० पर्यंतच्या संपूर्ण देय रकमेचा भरणा करून वीज देयक थकबाकी मुक्त केल्याबद्दल महावितरण आपणास सन्मानित करीत आहे.
आपण दि. ३/०४/२०२१ रोजी आपल्या कृषीपंप वीजजोडणीच्या संपूर्ण देय रकमेचा पूर्ण भरणा केला असल्यामुळे आपल्याकडे आजमितीस वीजबिलापोटी कोणतीही रक्कम थकबाकी ,चालू देयक येणे बाकी नाही करिता वीजबिल निरंक प्रमाणपत्र देण्यात आहे असे सन्मानपत्रात म्हटले आहे.
विजय ढमढेरे हे टिटवाळा न्यूज,मराठी 1 न्यूजचे शिरूर जि. पुणे येथील प्रतिनिधी ,पत्रकार आहेत.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे