चासकमान धरणातील पाणी सोडण्याची शिक्रापूर ग्रामपंचायतीची मागणी
शिरूर:- चासकमान धरणातील पाणी कॅनाॅलद्वारे शिक्रापूर परिसरातील वेळनदी,राऊतवाडी,वाबळेवाडी,बुधे वस्ती,चारी नंबर ११,१२,१३ ला सोडण्यात यावे अशी मागणी शिक्रापूर ग्रामपंचायतीचे प्रशासक रमेश गडदे यांनी शिक्रापूर पाटबंधारे विभागाच्या शाखाअ़भियंत्या़कडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात असे म्हटले आहे, शिक्रापूर येथील वेळ नदी,बंधारे,राऊतवाडी,बुधेवस्ती,येथे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विहीरी़चे पाणी कमी झालेले आहे. सध्या चासकमान प्रकल्पाचे पाणी शिक्रापूर मधील वेळ नदीला,सर्वं ओढ्यांना,तळ्यामध्ये पाणी सोडण्यात यावे. पाणी सोडल्यास पाणीपुरवठा विहीरीची,कुपनलिकेची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. गावातील वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा करणे,पिके जगविणे शक्य होईल.तसेच जनावरे जगविणे ही शक्य होईल. आपल्या स्तरावरून शिक्रापूर परिसरातील वेळनदी,बंधारे राऊतवाडी,वाबळेवाडी,बुधेवस्ती चारी नंबर ११,१२,१३ ला चासकमान धरणाचे पाणी त्वरीत सोडण्याची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी ही विनंती असे निवेदनात म्हटले आहे.