शिक्षक समितीच्या मागणीला यश
दिवाळी पूर्वी शिक्षकांना मिळणार वेतन-शासन आदेश निर्गमित
अमरावती दि.२४-दिवाळी हा महत्वाचा सण असल्यामुळे माहे आॅक्टोबरचे वेतन दिवाळी पूर्वी दयावे या करीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी ९आॅक्टोबरला शालेय शिक्षण मंञी,शिक्षण संचालक,शिक्षण आयुक्त यांना निवेदन सादर केले होते.या मागणीची दखल घेत शासनाने काल निधीची तरतुद करुन निधी सर्व जिल्हा परीषदला पाठविला होता तर आज सर्व कर्मचार्यांचे २५आॅक्टोबरला वेतन करण्याचे आदेश निर्गमित केले त्यामुळे सर्व कर्मचारी यांच्यामध्ये खुशीचे वातावरण आहे.पण दर वर्षाला सणा निमित्य सण अग्रिम मिळत असतो पण या सण अग्रिमचे शासन आदेश आले नाही त्यामुळे कर्मचारी यांच्यात थोडी नाराजी आहे असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी व्यक्त केली.
संचालनालय, लेखा व कोषागारे यांचेद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या सर्व संगणक प्रणालींच्या संदर्भात मे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांचेकडील Data Managed Hosting चे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांचेकडे हस्तांतरीत करण्याच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर दि. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी देय ठरणारे माहे आॅक्टोबर, २०२४ चे वेतन आणि निवृत्तिवेतन दि.२५ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.यासाठी मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी आणि महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम ३२८ आणि नियम ३२९ मधील तरतुदी शिथील करण्यात येत आहेत. माहे ऑक्टोबर, २०२४ च्या वेतनाचे आणि निवृत्तिवेतनाचे प्रदान दि.२५ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके आणि निवृत्तिवेतन देयके त्वरीत यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई; संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय, उप कोषागार कार्यालय येथे सादर करावीत. सदर निर्णय जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषि विद्यापीठे, अकृषि विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालये यांचे अधिकारी / कर्मचारी, तसेच निवृत्तिवेतनधारक यांना देखील लागू होईल. माहे ऑक्टोबर, २०२४ च्या वेतनाचे आणि निवृत्तिवेतनाचे प्रदान दि.२५ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी होण्यासाठी संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच सर्व जिल्हा कोषागार कार्यालये व उप कोषागार कार्यालये यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात.असे आदेश डॉ. राजेंद्र सुमन उत्तमराव गाडेकर शासनाचे उप सचिव यांनी दिले आहे.