बाजारामध्ये बनावट पावत्यांबाबत संस्थेकडे कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित कर्मचा-यावर योग्य ती कारवाई ; शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय पाचंगे यांना पत्र
-----------------
बाजारामध्ये बनावट पावत्यांबाबत संस्थेकडे कोणतीही तक्रार प्राप्त नसून अशा तक्रारी संस्थेकडे प्राप्त झाल्यास संबंधित कर्मचा-यावर नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजपा उद्योग आघाडी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांना पत्राद्वारे कळविले आहे.
शिरूर बाजार समितीच्या मुख्य बाजार व उपबाजार आवारात शेतक-यांच्या भाजीपाला तरकारी मालासाठी कायम विभाग सुरू करणेबाबत ,शीतगृह बांधण्याबाबत पाचंगे यांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे १४/०३/२०२३ रोजी अर्ज केला होता.या अर्जाला उत्तर देताना शिरूर बाजार समितीने पाचंगे यांना कळविलेल्या पत्रात असे म्हटले आहे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार शिरूर येथे असून यार्डवर धान्य बाजार शेतकरी ते ग्राहक या थेट विक्री अंतर्गत भाजीपाला व तरकारी बाजार तसेच शेतीपुरक व्यवसायाची दुकाने आहेत.यार्डवर भाजीपाला व तरकारी बाजार थेट विक्री अंतर्गत भरत असून सदरचे बाजार मध्ये शेतमाल विक्रीसाठी येणा-या शेतक-यांना माल उतरविणेसाठी बाजार समितीने शेड व त्याच्याशेजारी इमारत उभारलेली आहे. भाजीपाला व तरकारी बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्यामुळे सदरची जागा कमी पडत आहे. यार्डवरील रस्त्यालगतचे मोकळ्या जागेमध्ये शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी बसतात. हे जरी खरे असले तरी बाजारसमितीने सदरचे ठिकाणी वेळोवेळी मुरूम टाकून शेतक-यांना माल विक्रीसाठी जागा करून दिलेली आहे. संपूर्ण शेतकरी बाजारमध्ये लाईटची मुबलक व्यवस्था केलेली आहे. शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी अतिशय चांगल्या दर्जाचे व नेहमी स्वच्छ असणारे स्वच्छतागृह ,स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे. यार्डवर संरक्षणासाठी सी सी टी व्ही उभारलेले आहेत. शेतकरी ,खरेदीदारांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी आर ओ प्लान्टची उभारणी केलेली आहे. पुढील काही दिवसांत यार्डचे उत्तरेकडील असणा-या मोकळ्या जागेत शेतक-यांना शेतमाल विक्रीसाठी शेडची उभारणी करण्याचे नियोजन करत आहोत.
त्याचप्रमाणे उपबाजार पिंपळे जगताप व पाबळ येथे यार्डवर भाजीपाला व तरकारीची जाहीर लिलावाने खरेदी विक्री होत असून तेथे शेतक-यांचा शेतमाल विक्रीसाठी शेडची उभारणी केलेली आहे. संरक्षणासाठी कंपाऊंडवॉल , सी सी टी व्ही ची उभारणी केलेली आहे. सध्या उपबाजार पिंपळे जगताप येथे यार्डचे जागेबाबत मा.उच्च न्यायालय मुंबई येथे सुनावण्या सुरू असून सदरचे केसचा निकाल लागल्यानंतर पिंपळे जगताप यार्डवर शेतक-यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देत आहोत.
तसेच दर शनिवारी मुख्यबाजार शिरूर येथे यार्डवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी व व्यापारी शेतमाल खरेदी विक्रीसाठी येतात. त्यांच्याकडून बाजार समितीच्या कर्मचा-यांंमार्फत थर्मल प्रिंटरद्वारे मेन्टेनन्स चार्जेसची वसूली केली जाते. सदरची वसूली करणा-या कर्मचा-यांवर देखरेख ठेवणेसाठी वरिष्ठ कर्मचा-यांकडून बाजारमध्ये अचानक तपासणी केली जाते असे पत्रात म्हटले आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
शिरूर जि.पुणे
8975598628