३५ बुलेट सायलन्सरवर शिरूर पोलीसांनी फिरवला रोडरोलर
नाट्यपरिषद शिरूर तालुका सदस्य राजाराम गायकवाड यांच्या मागणीला यश
टिटवाळा वेब पोर्टल न्यूज प्रतिक्रियेसंंदर्भातील बातमीचा इफेक्ट, परिणाम
शिरूर:-
कर्कश आवाज करणा-या बुलेटस्वारांच्या जप्त केलेल्या ३५ सायलन्सरवर शिरूर पोलीसांनी रोडरोलर फिरवण्याची कारवाई केली.
शिरूर शहरातील शाळा, काॅलेज , बसस्थानक, गर्दीच्या ठिकाणी बुलेट सायलन्सरमधून कानठळ्या बसविणारा,फटाक्यांचा आवाज काढणा-या,कर्कश आवाज करणा-या बुलेट सायलन्सरवर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महिला पोलिस हवालदार भाग्यश्री जाधव , पोलीस अंमलदार विरेंद्र सुंभे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, ज्ञानदेव गोरे,विकी मैद यांनी शिरूर शहरातील काॅलेज शाळा, बसस्थानक, गर्दीच्या ठिकाणी गस्त कारवाई करत एकूण ३५ बुलेट ताब्यात घेवून कर्कश आवाज करणारे ३५ सायलन्सर जप्त केले होते. जप्त करण्यात आलेल्या या ३५ बुलेट सायलन्सरवर दि.१८ मार्चला शिरूर पोलीसांकडून रोडरोलर फिरविण्यात आला .
दरम्यान,खराडीच्या रस्त्यावर बुलेट वेगात चालवून फटाक्यांचा आवाज काढणा-या टुकार ११ बुलेटस्वारांवर दंड वसूल करण्याची कारवाईही नुकतीच क्रण्यात आली होती.या बातमी बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नाट्य परिषदेचे शिरूर तालुका सदस्य, शिक्रापूर येथील पत्रकार राजाराम शंकर गायकवाड यांनी म्हटले होते,
बुलेटच्या सायलन्सरमधून कानठळ्या बसवणारा आवाज काढण्याचे शहरी भागातील लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे. ग्रामीण भागातील पोलीसांकडून अशी कारवाई होणे अपेक्षित आहे . कानठळ्या बसवणारा आवाज काढणा-या बुलेट राजांना समज देणेही अपेक्षित आहे.
नाट्य परिषद शिरूर तालुका सदस्य , पत्रकार राजाराम गायकवाड यांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात तसेच मागणी संदर्भात "टिटवाळा वेब पोर्टल न्यूजने" दि. २१ फेब्रुवारी २०२५ ला बातमी प्रसिद्ध केली होती.
३५ बुलेट सायलन्सरवर रोडरोलर फिरविण्याच्या शिरूर पोलीसांनी केलेल्या कारवाईचे नाट्य परिषद शिरूर तालुका सदस्य , पत्रकार राजाराम गायकवाड यांनी स्वागत केले आहे.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर )