शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे मल्हार गडावर चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शिवमल्हार सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा रविवार मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी गुरूवार या कालावधीत मल्हार गडावर चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सकाळी अभिषेक, पादुका मंदीर, घटस्थापना, उत्सवमुर्ती मिरवणूकीने ख़डोबा मंदीराकडे प्रस्थान ,घटस्थापना,वीणापुजन ,श्री मल्हारी मार्तंड विजय ग्रंथपुजन जागरण, आरती या कार्यक्रमांनी चंपाषष्ठी महोत्सवास सुरूवात झाली.
सकाळी ९ वाजता उत्सवमुर्ती श्री.खंडोबा मुर्ती पालखीतून संबळवाजंत्र्याच्या साथीत विठ्ठल रूक्मिणी मंदिरातून ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय चौक, मारूती मंदीर, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, बोल्हाई मंदीर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या मार्गे मिरवणुकीने श्री.खंडोबा गडावर नेण्यात आली. शिवमल्हार सेवा ट्रस्टचे अध्यक्ष निळूभाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापुराव दादासाहेब गायकवाड, टिटवाळा न्यूज प्रतिनिधी विजय ढमढेरे, उद्योजक श्री.नितीनशेठ गायकवाड, जनार्दन जुनवणे, बाळासाहेब रासकर, विलासराव चव्हाण, दिपक गायकवाड,अक्षय गायकवाड, तुकाराम दरवडे, विलास सांगडे, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन ,माजी पोलीस पाटील बाळासाहेब बापुराव गायकवाड , संजय गायकवाड, राजेंद्र गायकवाड, ऋषिकेश गायकवाड ,ग्रामस्थ उत्सवमूर्ती पालखी सोहळा मिरवणूकीत सहभागी झाले होते.
विलासराव चव्हाण बाळासाहेब रासकर यांच्या हस्ते वीणापुजन, श्री मल्हारी मार्तंड विजय ग्रंथ पुजन करण्यात आले.
हरिपाठ व खंडोबाची आरती, हरिजागर,पारायण,नागपुजन व दिपोत्सव, आरती व घट हलविणे,देवाचा साखरपुडा व नगर महामार्गापासून मिरवणूक , हळद फोडणे व घाणा घालणे, हळद लावणे व बांगड्या भरणे नगररोडपासून शेळ्या, मेंढ्यांची मिरवणूक व रिंगण ,पांडूरंगाच्या मंदिरापासून देवाची पालखी मिरवणूक जागरण गोंधळ असे कार्यक्रम पार पडणार असून श्री क्षेत्र आणे ता.जुन्रर येथील श्री.किसनराव दाते यांनी बनविलेल्या आमटी व भाकरीच्या महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप होणार असल्याचे शिवमल्हार सेवा ट्रस्टचे अध्यक्ष निळूभाऊ गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते बापूराव दादासाहेब गायकवाड यांनी सांगितले .