शिरूर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना फेटे बांधून स्वागत
Raju Tapal
June 16, 2022
33
विठ्ठलवाडी ता.शिरूर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी श्री पांडुरंग विद्या मंदिर या विद्यालयात नवागतांचे स्वागत विद्यार्थ्यांना फेटे बांधून ट्रेलर मधून मिरवणूक काढून करण्यात आले.
विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथे श्री पांडुरंग विद्या मंदिर या विद्यालयाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व नवागत विद्यार्थ्यांची फेटे बांधून,ढोल-ताशांच्या गजरात ट्रेलर मधून मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे पालकांनी कौतुक केले.या विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेली शालेय पाठ्यपुस्तके फुलांच्या झाडांची रोपे,व शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते देऊन भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अण्णा गवारी उपाध्यक्ष लव्हाजी लोखंडे हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष बबनराव गवारे ,उपाध्यक्ष बापूसाहेब पवार,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजीराव गवारे, शाळा समितीचे सदस्य संभाजीराव शिंदे,सोसायटीचे माजी अध्यक्ष काळूराम गवारी,माजी उपसरपंच सोपानराव गवारे,माजी मुख्याध्यापक सुरेशराव थोरात मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब लोले,संभाजीराव पांडुरंग गवारे,अभियंता राहुल गवारे,डॉ. चंद्रकांत केदारी या माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याची मदत केली. प्रवीणकुमार जगताप व बाळासाहेब गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताचे नियोजन केले होते.
Share This