• Total Visitor ( 134237 )

शिवसेना देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

Raju tapal January 08, 2025 23

परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे वैभव नाईक 

सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहणे गरजेचे सतीश सावंत

शिवसेना देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

देवगड:-निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागला नसला तरी आपण सातत्याने जनतेचे काम करीत राहिले पाहिजे. लोकांमध्ये मिसळून  त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या भक्कमपणे पाठीशी राहिले पाहिजे.आजची परिस्थिती उद्या बदलेल मात्र  परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
            
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक आज इंद्रप्रस्थ हॉल देवगड सातपायरी येथे संपन्न झाली. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, नगरसेवक बुवा तारी, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर,हर्षा ठाकूर,संतोष तारी, वर्षा पवार,सरपंच मेनिका पुजारे,रमाकांत राणे,विशाल मांजरेकर, संदीप ढोलकर,सरपंच पूर्वा जाधव, सुनील जाधव, बाजीराव जाधव, सचिन खडपे, यदुनाथ ठाकूर, सरपंच दीपक कदम, मंगेश पाठक,फरीद काझी आदींसह शिवसेना पदाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते. 
          
सतीश सावंत म्हणाले,जनतेची छोटी मोठी कामे करणे, वैयक्तीत योजनांचा लाभ मिळवून देणे हे काम अविरतपणे आपण सुरु ठेवले पाहिजे. येणाऱ्या काळात पदाधिकारी कार्यकर्त्यांची एकजूट टिकवून ठेवणे आणि  जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहणे गरजेचे आहे. तर जनता नक्की आपल्याला  साथ देईल असे सांगितले.

Share This

titwala-news

Advertisement