शिवसेनेचे दहा शिलेदारांना प्रचंड मतांनी विजयी करा - जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील
मुरबाड नगर पंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दहा उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केले आहे.
मुरबाड नगर पंचायत निवडणुकीसाठी मुरबाड मध्ये शिवसेनेचे दहा उमेदवार उभे राहिले असून यामध्ये प्रामुख्याने गिरजाबाई खारीक, अर्जुन शेळके,नितीन तेळवणे, सुवणाॅ देसले, नम्रता तेळवणे, अक्षय रोठे,विलास खडकबाण,सिमा रोठे,मोनिका शेळके,श्रीकात कोर,विलास खडकबाण इत्यादी दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना मुरबाड नगर पंचायत मध्ये बसवावे लागेल तेवढा विकास निधी नगर विकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून आणून देण्याची जबाबदारी माझी असे प्रकाश पाटील यांनी सांगितले. मुरबाड मध्ये हॅलीपॅड उतरण्यासाठी जागा नसल्याने पालक मंत्री एकनाथ शिंदे हे येऊ शकले नाहीत. या प्रचार सभेला जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, भिवंडी आमदार शांताराम मोरे, जिल्हा परीषद अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, तालुका प्रमुख कांतिलाल कंटे इत्यादी शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी कामगार अध्यक्ष
कुष्णाकात कोंडले यांनी आपल्या भाषणात शिवसैनिक कडवा असवा भडवा नसावा असे वक्तव्य केले.