श्रमिक मुक्ती संघटना यांचे प्रांत ऑफिस कल्याण वर धडक मोर्चा
आज दिनांक 13/12/2021 रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड,शहापूर,कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील वनहक्क पट्टे प्रलंबित दावे व अन्य प्रलंबित मागण्यांबाबत श्रमिक मुक्ती संघटना यांचे वतिने प्रांत ऑफिस वर धडक मोर्चा,या आंदोलनात मुरबाड, शहापूर, कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील हजारो आदिवासी लोक या आंदोलनात सहभागी झाले होते,व या आंदोलनात अनेक घोषणा देण्यात आले, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, वनपट्टे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा अनेक घोषणा देत जमिनीचे वन हक्क पट्टे मिळणे बाबत प्रांत साहेबांकडे वनपट्टे प्रलंबित यासंदर्भात निवेदन लोकांकडून देण्यात आले, या आंदोलनासाठी श्रमिक मुक्ती संघटनेचे अध्यक्ष, श्रीमती इंदवी तुळपुळे मॅडम,विशाल जाधव (कल्याण),गणपत मेंगाळ,दशरथ वाघ, प्रभाकर देशमुख, गणपत वाघ, लक्ष्मण वाघ, विकास बरतड, धेणूबाई मुकणे, सुप्रिया हरड सह असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते,