क्षेत्रपाल श्री देव वेतोबा" व "रात्रीस खेळ चाले" या गाजलेल्या लोकप्रिय मालिकेत उत्तम भुमिका साकारणारे जेष्ठ कलाकार तसेच कुडाळ शहरातील रहिवाशी श्री नित्यानंद जडये यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी रात्री दुःखद निधन झाले आहे.
कुडाळ:-"क्षेत्रपाल श्री देव वेतोबा" या गाजलेल्या लोकप्रिय मालिकेतील भिकू काका (वेतोबाचे पुजारी) ही भूमिका साकारणारे तसेच "रात्रीस खेळ चाले" या सिरीयलमध्ये उत्तम भूमिका करणारे कुडाळ शहरातील कुडाळेश्वर मंदिर नजिक येथील रहिवासी तसेच जेष्ठ नाट्य आणि सिने कलाकार श्री नित्यानंद जडये यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ - ३० वाजता दुःखद निधन झाले आहे.