श्री क्षेत्र आळंदी येथे भागवत कथा , ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता
ह.भ.प. श्रीनिवास महाराज उखळीकर यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा ,ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची बुधवारी सांगता झाली.
टाळ मृदंगाच्या निनादात सकाळी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात भाविकांनी नगरप्रदक्षिणा केली.
सप्ताहात ७ दिवस हभप बाळासाहेब लटपटे महाराज यांनी भागवत कथा कथन करून भाविकांना भगवत भक्तीत तृप्त केले.
दैनंदिन कीर्तन, भजन, हरिपाठ काकड आरती, हरिजागर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
मंगळवारी सकाळी भजनी मंडळ प्रमुख वाल्मिक नरहरी फड यांच्या हस्ते ग्रंथ सांगता पुजा , हभप श्रीनिवास महाराज पंढरपूर यांची पुजेची कीर्तन सेवा झाली.
ह.भ.प.गणेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन आणि खादगावकर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होवून सांगता झाली.