• Total Visitor ( 503615 )
News photo

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांचे सत्याग्रह आंदोलन मागे         

Raju tapal June 14, 2025 72

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांचे सत्याग्रह आंदोलन मागे         



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील आमदाबाद ते मलठण या रस्त्याच्या तसेच याच रस्त्यावरील कोंढाण‌ पुलाच्या अशास्त्रीय,निकृष्ट कामाच्या सखोल चौकशी बरोबरच तालुक्यातील इतर रस्त्यांच्या दुरवस्थेकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी २ जून पासून शिरूर तहसिलदार कार्यालयासमोर सुरू केलेले सत्याग्रह आंदोलन मागे घेतले.

आंदोलनाबाबत सकारात्मक तोडगा निघत नसल्यामुळे ९ जून पासून अन्नत्याग आंदोलनही सुरू केले होते.

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी सुरू केलेल्या सत्याग्रह आंदोलनाला भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे‌ यांनी आंदोलनस्थळी जावून पाठिंबा दर्शविला होता.

भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत टिटवाळा न्यूज ने दि.१० जून रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.

सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी १३ जूनला आंदोलनस्थळी येवून सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांच्या सर्व मागण्या मान्य करून लेखी पत्र दिल्याने निलेश वाळूंज यांनी त्यांचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे समजते.

माजी नगरसेवक विठ्ठल पवार,डाॅ.संतोष शिंदे,गणेश जामदार,प्रकाश थोरात,माऊली पवार,दत्तात्रय कुरूंदळे, लक्ष्मण कुरूंदळे,विशाल कुरूंदळे,प्रताप दसगुडे,कल्पना पुंडे,सीमा गिरमकर मंदा वाळूंज,महेश कुरूंदळे यावेळी उपस्थित होते.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement