कल्याण तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांनी घेतल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी..
कल्याण ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांनी आज नवनियुक्त कल्याण तहसीलदार देशमुख यांची सदिच्छा भेट घेऊन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली त्यास तहसीलदार साहेबांनी आपणांस पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर गटविकास अधिकारी अशोक भवारी यांची देखील भेट घेऊन तालुक्यातील विविध विषयावर चर्चा करून सहकार्य करण्याची विनंती केली.
त्यावेळी त्यांच्यासोबत ओबीसी विभागाचे प्रदेश सहसचिव दिनेश सासे, इंटकचे सचिव सुनिल शिर्के, जेष्ठ कार्यकर्ते वसंत जाधव, दुंदाराम चौधरी यासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.