सोनेसांगवी ता.शिरूर येथील गायरान गट नंबर ८४ मधून अनधिकृतपणे मुरूम उत्खनन ; भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरूर तालुकाध्यक्ष अमोल बो-हाडे पाटील यांची तक्रार
----------------
शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी येथील गायरान गट नंबर ८४ मधून अनधिकृतपणे मुरूम उत्खनन केल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा शिरूर तालुकाध्यक्ष अमोल बो-हाडे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सोनेसांगवी ता.शिरूर जि.पुणे येथे गावातील ग्रामपंचायतीने अंतर्गत रस्त्याचे मुरूमीकरणाचे कामाचे टेंडर काढून संबंधित ठेकेदारास काम दिले.परंतू सदर ठेकेदाराने गायरानातील व गावातील खाजगी जमिन मालकांच्या हद्दीतून १००० ते १५०० ब्रास मुरूम कसलीही परवानगी न घेता व रॉयल्टी न भरता रस्ता पूर्ण केला. सदर मुरूमाच्या उत्खनन पंचनाम्यावर गावचे सरपंच व पोलीस पाटील यांनी सह्या केल्या आहेत. ठेकेदाराने गायरानातील मुरूमाची चोरी करूनही सरपंच व पोलीस पाटलाने संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला नाही.
गायरान गट नंबर ८४ मधून अनधिकृतपणे मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी ६ लाख ७८ हजार ४०५ रूपयांचा दंड ठोठावण्यात का येवू नये ? असे आदेश दिले असल्याचे भाजपा युवा मोर्चा शिरूर तालुकाध्यक्ष अमोल बो-हाडे यांनी सांगितले.
११/८/२०२१ रोजी सोनेसांगवी ग्रामपंचायतीने रस्त्याचे टेंडर तुषार मोहन सातव या ठेकेदारास दिले. त्याने रस्ता तयार करण्यास सुरूवात केली. आणि गायरान गट नंबर ८४ मधून मुरूम उत्खनन केले. त्याची तक्रार प्रांतसाहेब संतोषकुमार देशमुख यांच्याकडे तहसीलदार शेख यांच्याकडे केली. त्यांनी तलाठी शैजुळ यांना पंचनाम्याचे आदेश दिले. तलाठ्याने पंचनामा केला. पंचनाम्यावर सोनेसांगवीचे सरपंच दत्तात्रय त्रिंबक कदम पोलीस पाटील खोमणे यांनी सह्या केल्या. पोलीस पाटील शासनाचे मानधन घेतो चोरीच्या तक्रारी पोलीस स्टेशन आणि महसूल कार्यालयापासून लपवून ठेवत आहे. जर सरपंच दत्तात्रय कदम हे गावचे सरपंच आहे चोरीच्या घटना लपवून ठेवतात म्हणजेच या दोघांचा देखील या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे हे दिसून येत आहे.
पोलीस पाटील व सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी महसुल विभागाचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे असे बो-हाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सन २००३ पासून सोनेसांगवीचे सरपंच असणारे मीनाक्षी डांगे, दत्तात्रय कदम, अलका कदम यांच्या कार्यकाळात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे सदर भ्रष्टाचाराचे पुरावे सोनेसांगवी जनतेपुढे,नागरिकांपुढे मांडणार असल्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरूर तालुकाध्यक्ष अमोल बो-हाडे पाटील यांनी सांगितले.