महागाव यवतमाळ येथील अनुसूचित जाती जमाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेजवळ सोयाबीन भरलेले ७०० पोते, हळकुंड भरलेले ४०० पोते बेवारस स्थितीत आढळून आले आहे.
या शेतमालावर हक्क सांगणारे कोणीही पुढे आले नाही.
नांदेड तालुक्यातील हदगाव येथील वेअर हाऊसमधून या शेतमालाला पाय फुटल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे. मरसूळ येथील मास्टर माईंडचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे.
सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास लालरंगाच्या दोन ट्रकमधून सोयाबीन व हळद महागावात आली.निवासी शाळेजवळ मोकळ्या जागेत हा माल हमालांच्या मदतीने खाली करून गंजी लावण्यात आली. ती गंजी ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आली.
सोमवारी रात्री ११ वाजता ठाणेदार विलास चव्हाण, पी एस आय उमेश भोसले यांनी घटनास्थळ गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनीही भेट देवून पाहणी केली.