भरधाव डंपरची पिकअपला धडक; दोघांचा मृत्यू
शिक्रापूर :- भरधाव डंपरने समोरून येणा-या पिक अप ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला.
सागर संभाजी कोळपे वय - २८ रा.मांडवगण फराटा, यश सुधाकर भिसे वय -१२ रा.खेडवाडी ता. गेवराई जि.बीड अशी अपघातातील मृतांची नावे असून अनिल बीरा कोळपे असे अपघातातील गंभीर जखमीचे नाव आहे.
मांडवगण फराटा येथून १७ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वडगाव रासाई गावाकडे भरधाव वेगाने जाणा-या एम एच ४२ एस इ क्यू ७६९६ या क्रमांकाच्या डंपरने समोरून येणाऱ्या एम एच ०३ ओ ई ०६३८ या क्रमांकाच्या पिकअप जीपला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे समजले.
डंपरचालक अपघातस्थळावरून फरार झाला असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.