केंद्र आसरा अंतर्गत स्पेल बी स्पर्धा संपन्न.
भातकुली- शनिवार सकाळी ठीक ८:०० केंद्र आसरा अंतर्गत केंद्रस्तरीय स्पेल बी स्पर्धेचे आयोजन जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा,आसरा येथे करण्यात आले होते.
यावेळी वर्ग ३रा व ४था यांचा एक गट,वर्ग ५वा व ६वा यांचा दुसरा गट व वर्ग ७ वा व वर्ग ८वा यांचा तिसरा गट अशा गटात विभागणी करून स्पेल बी स्पर्धा घेण्यात आली.
पहिल्या गटाला परीक्षक म्हणून प्रज्ञा रामटेके मॅडम व छाया पोटेकर मॅडम यांनी तर दुसऱ्या गटाला प्रशांत भाकरे सर, दिपक चिंचे सर व पंकज दहिकर सर यांनी व1तिसऱ्या गटाला प्रभाकर धांडगे सर व शैलेश मांदळे सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहले.
या स्पर्धेत केंद्र आसरा अंतर्गत सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या.
पहिल्या गटात कु.यशस्वी संदीप ढोलवाडे (जि.प.पूर्व माध्यमिक मराठी शाळा नांदेडा खुर्द) (प्रथम क्रमांक) कु.उजेफा फिरदोस शाह(जि.प.प्राथमिक मराठी शाळा सायत) (द्वितीय क्रमांक) दुसऱ्या गटात साहिल अ. सत्तार शेख (जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा आसरा ) (प्रथम क्रमांक),सिद्धेश नी.मोहोड (जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा, आसरा)(द्वितीय क्रमांक)तर तिसऱ्या गटात कु.मैत्रेयी अमोल गुडधे (जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा आसरा) (प्रथम क्रमांक) कु.अदिती प्र.सोळंके (जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा आसरा)(द्वितीय क्रमांक) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या कार्यक्रमाला गजानन सायंके सर (उच्च श्रेणी मुख्याध्यापक आसरा) शैलेंद्र स.दहातोंडे (केंद्रप्रमुख आसरा)प्रज्ञा रामटेके मॅडम (विशेष शिक्षिका) व आसरा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
या छोट्या व सुंदर स्पर्धेचे संचालन पंकज दहिकर सर यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश मांदळे सर यांनी केले, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्र आसरा अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधूभगिनी यांचे सहकार्य लागले.यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून,अभिनंदन करून स्पर्धेची सांगता करण्यात आली.