• Total Visitor ( 134211 )

शिक्षण विभागाचा अजब कारभार

Raju tapal March 28, 2025 37

आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनांनंतरही परिक्षेच्या वेळापत्रकात बदल नाही...!

शिक्षण विभागाचा अजब कारभार....!

विद्यार्थ्यांना सरबत द्या , पण परिक्षा मात्र उन्हातच घ्या...!

अमरावती दि.२८ :- राज्यात सर्वत्र उन्हाचा पारा वाढत चाललाय , उन्हाची तीव्रता लक्षात घेता राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन,  मदत व पुनर्वसन विभागाने  निर्गमित केलेल्या परिपत्रकात विद्यार्थ्यांचे आरोग्य व वाढत्या तापमानापासून बचावाच्या दृष्टीने काही तरतुदी केल्या आहे.
     त्यानुसार शाळेत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ताक ,सरबत ,  द्यावे. शाळा सकाळच्या सत्रात भरवावी ,  उष्माघातापासून बचावाच्या उपाययोजना कराव्या अशा विवीध तरतुदी करण्यात आल्या आहे. परंंतू आपत्ती व्यवस्थापन समिती च्या या निर्देशानंतरही  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कडून इयत्ता १ ली ते ९ वी च्या परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही.  विद्यार्थ्यांना सरबत,ताक,ओआरएस  द्या परंतू परिक्षा मात्र  एप्रिल च्या शेवट च्या आठवड्यात तळपत्या उन्हातच घ्या असा अट्टाहास राज्याच्या शिक्षण विभागाकडून केल्या जात असल्याचे दिसून येते.
     एकीकडे उन्हाची तिव्रता लक्षात घेता, इयत्ता १० वी व  १२ वी च्या  परिक्षा फेब्रुवारी , मार्च  महीण्यात आटोपल्या जातात परंतू दुसरीकडे  प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अगदी १ ली, २ री च्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा मात्र रखरखत्या उन्हात एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात घेणे ही बाब शिक्षण विभागाची असंवेदनशीलता व निष्ठूरतेचे उदाहरण म्हणावे लागेल.
 एप्रिल महिण्याच्या  रखरखत्या उन्हात लहानग्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेवून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा शिक्षण विभागाचा हेतू काय आहे हे मात्र कळायला मार्ग नाही.
 आतातरी वेळापत्रकात बदल करा...! एप्रील च्या शेवटच्या आठवड्यातील वाढते तापमान,  शाळांमधील अपु-या भौतिक सुविधा , विद्यार्थ्यांचे वय व आरोग्य या बाबी  एससीईआरटी ने परिक्षेचे वेळापत्रक ठरवताना लक्षात घ्यायला हव्या होत्या.आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिलेल्या सुचनांची दखल घेवून आता तरी एससीईआरटी ने शालेय  परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा. राजेश सावरकर ,राज्य प्रसिध्दी प्रमुख
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती 

 

Share This

titwala-news

Advertisement