• Total Visitor ( 134365 )

सकारात्मकता ठेवल्यास आपल्या जीवनात यश निश्चित; डाॅ.स्वाती गानू         

Raju tapal January 17, 2025 42

सकारात्मकता ठेवल्यास आपल्या जीवनात यश निश्चित - डाॅ.स्वाती गानू         

शिरूर :- युवापिढीने आपल्यात असलेले सुप्त गुण, आपली बलस्थाने आणि क्षमता ओळखून आपल्या आवडत्या क्षेत्रात वाटचाल करताना अंगी आत्मविश्वास, कठोर परिश्रम, धैर्य आणि सकारात्मकता ठेवल्यास आपल्याला जीवनात यश निश्चित प्राप्त करता येईल असे प्रतिपादन माजी प्राचार्या डॉ. स्वाती गानू यांनी केले .
 तळेगाव ढमढेरे ( ता.शिरुर ) येथील शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयात  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे शंकरराव ढमढेरे कला, वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना युवास्पंदन याविषयावर माजी प्राचार्या डॉ. स्वाती गानू बोलत होत्या .
प्राचार्य डाॅ.पराग चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ. पराग चौधरी म्हणाले की, युवा अवस्था हा जीवनातील सुवर्णकाळ आहे. या वयात आपण आपल्या अंगभूत गुणांचा शोध घेऊन आपल्यातील शारीरिक बौद्धिक क्षमताचा पूर्णपणे वापर करून आपण निवडलेल्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करावे 
याप्रसंगी  कार्यक्रम समन्वयक डॉ. दत्तात्रय कारंडे, डॉ. दत्तात्रय वाबळे डॉ. मनोहर जमदाडे, डॉ. पद्माकर गोरे, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. अमेय काळे , डॉ.प्रमोद पाटील प्रा.कुंडलिक कदम, प्रा.सुमेध गजबे, प्रा.केशव उबाळे, प्रा.अजिता भूमकर, प्रा.अश्विनी पवार, प्रा.कल्याणी ढमढेरे,अपर्णा लिमये  उपस्थित होते .
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र कार्यवाह डॉ. दत्तात्रय कारंडे, सूत्रसंचालन डॉ.दत्तात्रय वाबळे यांनी केले डॉ.सोमनाथ पाटील यांनी आभार मानले .
        

Share This

titwala-news

Advertisement