• Total Visitor ( 369757 )

सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने धायरीकरांचा जनआक्रोश मोर्चा

Raju Tapal January 19, 2022 82

सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने धायरीकरांचा जनआक्रोश मोर्चा



पुणे महापालिकेत नव्याने ३३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. अजून त्या गावांत म्हणाव्या अशा सुविधा उपलब्ध झालेल्या नसल्याने निषेध करण्यासाठी धायरीकरांनी जनआक्रोश मोर्चा काढला.



धायरी फाटा ते सिंहगड क्षेत्रीय कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व धायरी भागातील नगरसेवक राहूल पोकळे यांनी केले.



नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा टॅक्स २० टक्क्यांनी कमी व्हावा,टॅक्ससाठी सुलभ हप्त्यांची सोय असावी,



मुंबई,ठाणेच्या धर्तीवर पुण्यात देखील ५०० स्क्वेअर फूटच्या सदनिकांना कर माफ करण्यात यावा,



अभय योजनेचा कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढवावा, व सरसकट सर्व व्याज माफ करावे,



गावे जर पुणे मनपात असतील तर गुंठेवारी प्रक्रिया पी एम आर डी  का ? ते मनपा कडे वर्ग करण्यात यावे .गुंठेवारी.झाल्याशिवाय कराची सक्ती करू नये. 



पिण्याच्या पाण्याची धायरी व इतर  गावात तात्काळ सोय करण्यात यावी, तोपर्यंत महापालिकेने मोफत टँकर पुरवावेत.



प्रत्येक घरातून मोफत कचरा उचलला जावा. 



सिंहगड रोडला पर्यायी रस्ता काढल्याशिवाय पुलाचे काम सुरू करू नये.



धायरी व परिसरात अनेक ठिकाणी ड्रेनेजची व लाईटची सोय करून त्या ठिकाणी रस्ते करण्यात यावेत 



धायरी रोडवरील धोकादायक दुभाजक तातडीने काढून टाकावेत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement