• Total Visitor ( 84333 )

जिल्हाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीप सन्मान सोहळा 

Raju tapal November 28, 2024 20

जिल्हाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीप सन्मान सोहळा   

अमरावती /प्रतिनिधी 

दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अमरावती जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी गत निवडणुकीच्या तुलनेत उंचावली असल्याने यासाठी स्वीप व्यवस्थापन कक्षाने महत्वाची भूमिका बजावली. निवडणूक जनजागृतीसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व घटकांचा सन्मान व्हावा यासाठी दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद सभागृह 
अमरावती येथे दुपारी चार वाजता प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या प्रमुख उपस्थितीत, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र,महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिन्नू पी, परिविक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक २०२४ अमरावती जिल्हयाकरीता मतदार जनजागृती करीता
स्वीप व्यवस्थापन कक्षामार्फत आठ मतदार संघात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले आहेत. स्वीप कार्यक्रमात मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध सामाजिक संघटना, अशासकीय संघटना, प्रिन्ट मिडिया, सोशल मिडिया, विविध शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविदयालये इत्यादींनी सहभाग नोंदवून मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयल केलेले आहेत. ह्या सर्वांच्या प्रयत्नामुळे अमरावती जिल्हयाची मतदानाची टक्केवारी मागिल विधानसभा निवडणूकीपेक्षा ५ % अधिक वाढलेली असून ६६.४० इतकी झालेली आहे.

जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे या सर्वांमध्ये सहभागी असणाऱ्या घटकांचा सन्मान व्हावा याकरिता स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी 
संजिता महापात्र यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध अधिकारी,कर्मचारी यांचेसह विविध संस्था प्रतिनिधी, पत्रकार आदींचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. असे स्वीप कक्षाचे वतीने कळविण्यात आले आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement