पत्रकारांना मिठाई वाटप कार्यक्रमाचे शिक्रापूर येथे आयोजन
शिक्रापूर (प्रतिनिधी):- सर्व पत्रकार बांधवांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिक्रापूर (ता.शिरूर ) येथील कर्तव्य फाऊंडेशन तसेच कर्तव्य फाऊंडेशनचे सभासद यांच्या वतीने आज सोमवार दि.२०/१०/२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकारांना मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे तसेच कर्तव्य फाऊंडेशनच्या संस्थापक मनिषाताई गडदे यांनी मेसेजद्वारे,भ्रमणध्वनीद्वारे कळविले आहे. सर्व पत्रकार बंधूंची भेट व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून सर्व पत्रकारांनी संध्याकाळी ५ वाजता शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी गणराज मोबाईल शाॅपी याठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन कर्तव्य फाऊंडेशनच्या संस्थापक मनिषाताई गडदे,सरपंच रमेशराव गडदे यांनी केले आहे.