तब्बल दीड वर्षांनंतर शाळेचे द्वार विद्यार्थ्यांसाठी खुले...
Raju tapal
October 05, 2021
34
तब्बल दीड वर्षांनंतर शाळेचे द्वार विद्यार्थ्यांसाठी खुले...
शहापूर मधील खाडे विद्यालयात गुलाब फुल आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत...
शहापूर...
कोरोना च्या महाभयंकर भीतीने राज्यातील शाळा तब्बल दीड वर्षांनंतर विद्यार्थ्यांसाठी आज 4 ऑक्टोबर 2021 रोजी खुल्या करण्यात आल्या..
राज्य सरकार च्या सूचनेनुसार इयत्ता. 8वी ते 12वी साठी साठी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.
शहापूर मधील खाडे विद्यालयमध्ये आज विद्यार्थी वर्ग अतिशय प्रसन्न मुद्रेने शाळेत येताना दिसत होता. दीड वर्षानंतर मुलांच्या शाळा आज सुरु झाल्या.. अनेक विद्यार्थी आज शाळेत येण्यासाठी बेहद खूष म्हणून दिसत होते..
शाळा व्यवस्थापनाने कोरोना चे
सर्व नियम पाळून व शासनाच्या सर्व सूचना लक्षात घेऊन आम्ही योग्य ती खबरदारी घेणार आहोत..यामध्ये प्रत्येक वर्गात स्यानिटायझर ठेवणे.. विद्यार्थ्यांना मास्क साठी सक्ती करणे अशा आशयाचे सूचना वेळोवेळी राबवण्यात येतील असे सूतोवाच शाळा संस्था सचिव विद्या ताई खाडे यांनी केले आहे. विद्यार्थी वर्गाने बोलकी प्रतिक्रिया म्हणजे आम्ही आज खूप खूष आहोत असं म्हटलं आहे.
आजच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने शाळेकडून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन विद्यार्थी वर्गाचे स्वागत करण्यात आले...
Share This