तळेगाव ढमढेरे येथे शिक्षिका ,विद्यार्थी व विद्यार्थीनींचा गुणगौरव ,सत्कार समारंभाचे आयोजन
महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालय तळेगाव ढमढेरे नं.२ च्या २१ विद्यार्थींनींनी नेत्रदीपक यश मिळविल्याबद्दल ९ विद्यार्थींनी राज्य गुणवत्ता यादीत , १२ विद्यार्थीनी जिल्हा गुणवत्ता यादीत ,कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालय तळेगाव ढमढेरे नं.१ च्या ४ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकाविल्याबद्दल संभाजी भुजबळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुरूवार दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता तळेगाव ढमढेरे ता.शिरूर येथील संत शिरोमणी सावता महाराज मंगल कार्यालयात मार्गदर्शक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे असे सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजाराम शिंदे यांनी सांगितले.
केंद्रप्रमुख रामदास विश्वास, केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे, मुख्याध्यापक अशोक राऊत, मुख्याध्यापक जयवंत भुजबळ, यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ.सीमा भुमेश गवारी, श्रीमती सुनिता जाधव, सौ.जयश्री विश्वास या मार्गदर्शक शिक्षिकांचा सत्कार करण्यात येणार आहे असे पतसंस्थेचे चेअरमन राजाराम शिंदे यांनी सांगितले.