तळवाडा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा
----------------------------------------
9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शहापूर तालुक्यातील डोळखांब जवळील तळवाडा येथे मेलजोल या सामाजिक संस्थेच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केलागेला
सर्व प्रथम जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तारपा नृत्य कांबड नृत्य महिलांचे गौरी नाच, पारंपारिक नृत्य सादर करण्यात आले चोंढे खुर्द मेट येथील ग्रामस्थांचे कांबडनाच कार्यक्रमाचे आकर्षण ठरले
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून किन्हवली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हनुमंत पवार साहेब, मस्के साहेब, पोलीस पाटील मच्छिंद्र मराडे, सरपंच अंकुश बरतड हे उपस्थित होते
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी रॅलीत भाग घेतला चित्रकला स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बुधाजी बरतड शिडू भगत चंद्रकांत बरतड पुनम पवार तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नामदेव वेखंडे सर व शिक्षक वृंद यांनी विशेष मेहनत घेतली.