ऑल इंडिया ब्रेनडेव्हलपमेंट परीक्षेत तनीषा सातार्डेकर हिने पटकविले सुर्वणपदक
सिंधुदुर्ग :- वेंगुल्याची सुकन्या व सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ला शाळेची विद्यार्थीनी तनीषा मनीष सातार्डेकर हिने २०२४ २५ या वर्षामध्ये घेण्यात येणाऱ्या ऑल इंडिया ब्रेनडेव्हलपमेंट परिक्षेमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाकडुन तसेच सर्वस्तरातुन तिचे कौतुक होत आहे.
तनीषा मनीष सातार्डेकर हिने इयत्ता पहिली मधुन इंग्रजी माध्यमातुन घेण्यात येणाऱ्या ऑल इंडिया ब्रेनडेव्हलपमेंट परिक्षेमध्ये सुवर्ण पदक मिळवीले असुन ऑल इंडियामधील पहिल्या शंभर विद्यार्थ्यानमध्ये तिचा समावेश झाला असुन ऑल इंडियामधील पहिल्या शंभर विद्यार्थ्यानमध्ये स्थान मिळविण्याचा तिने मान मिळविला आहे.
तिच्या ह्या यशामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ला मधील सर्वच शिक्षकांचे तिला याकामी मोलाचे मार्गदर्शन लाभले.ऑल इंडिया ब्रेनडेव्हलपमेंट परिक्षेमध्ये पहिल्या शंभर विद्यार्थ्यानमध्ये तिचा समावेश झाल्याने व तनीषा मनीष सातार्डेकर हीने सुवर्ण पदकाची कमाई केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली असुन तीच्या या यशाबद्दल तीचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.