तरूणाच्या खूनप्रकरणी चार आरोपींपैकी तिघांना अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलीसांची कामगिरी
--------------------
कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या तरूणाचा खून करणा-या चार आरोपींपैकी तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाच्या पोलीसांनी अटक करण्याची कामगिरी केली.
सनी सुरेश बारंगळे रा.सम्राट चौक भोर, अमिर महम्मद मणेर ,समीर महम्मद मणेर दोघेही रा. नवी आळी भोर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून पुणे -सातारा महामार्गावर कापूरहोळ येथील पुलाखाली रविवारी दि.३ ऑक्टोबरला रात्री अकरा वाजता आरोपींना अटक केली.
तिघेही बेंगलोरला पळून जाण्याच्या तयारीत होते.
भोर शहरातील सम्राट चौकात शनिवारी ता.२ ऑक्टोबरला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आनंद गणेश सागळे वय -२३ यास तिघा आरोपींनी सिद्धांत संजय बोरकर रा.स्टेट बँकेजवळ ,भोर याच्यासमवेत दगडाने ठेचून ठार केले होते.
यानंतर चौघेही आरोपी फरार झाले होते.
मयत आनंद याची आई वर्षा गणेश सागळे यांनी याबाबत भोर पोलीसांत फिर्याद दाखल केली होती.
तिनही आरोपींना भोर पोलीसांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
भोरचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे पुढील तपास करीत आहेत.