शासन निर्णय रद्दसाठी शिक्षक समिती करणार आंदोलन
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन
अमरावती, ता.१२ :- राज्यातील शाळांमधील शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करणारा व स्वतःच्या गावातील शिक्षण मिळविण्याचा हक्क डावलणारा शासन निर्णय रद्द केला पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती १७ मार्च रोजी संपूर्ण राज्यात धरणे व निदर्शने आंदोलन करणार आहे.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १२ते५ प्राथमिक शिक्षक धरणे आंदोलन करणार आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ मार्च २०२४ शासन निर्णयानुसार २०२४-२५ संचमान्यता अंतिम करण्यात आली आहे. शिक्षण कायद्यातील तरतुदीच्या व २८ ऑगस्ट २०१५ (सुधारित ८ जानेवारी २०१६) विसंगत अशा शासन निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार नाही, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात हजारो शिक्षक अतिरिक्त होतील. शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडसर निर्माण होईल.
शाळेत शिक्षक नसल्याने व अत्यंत कमी शिक्षक असल्याने पालकांना आपल्या पाल्यांना परगावच्या शाळेत दाखल करावे लागेल. विद्यार्थ्यांच्या
शिक्षणाची परवड होईल व मुलींची सुरक्षितता धोक्यात येण्याची स्थिती आहे. दररोज जाणे-येणे करण्याच्या स्थितीमुळे गळतीचे प्रमाण वाढेल.
याबाबत २५ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय अद्यापही रद्द करण्यात आलेला नाही. शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करणारा व स्वतःच्या गावातील शिक्षण मिळविण्याचा हक्क डावलणारा शासन निर्णय रद्द केला पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती १७ मार्च रोजी संपूर्ण राज्यात धरणे व निदर्शने आंदोलन करणार आहे.या आंदोलनात शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन
राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगाकर, शिक्षक नेते,उदय शिंदे, गोकुलदास राऊत,जिल्हा सल्लागार संभाजी रेवाळे, राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर, राज्य महीला प्रतिनिधी प्रविणा कोल्हे,जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार,जिल्हा सरचिटनिस शैलेन्द्र दहातोंडे,जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत निमकर,जिल्हा कोषाध्यक्ष नंदकिशोर पाटिल,महीला आघाडी प्रमुख सरीताकाठोळे,जिल्हा महीला सरचिटणीस विनिता घुलक्षे, जिल्हा कार्याध्यक्ष सुषमा वानखडे, जिल्हा कोषाध्यक्ष भावना ठाकरे,जिल्हा कार्यालयीन सचिव मनिष काळे, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद मुंडे, गजानन दातीर, दत्तात्रय रहाटे,एन,पी.एस. जिल्हाध्यक्ष अल्हाद तराळ, जिल्हा सरचिटणीस प्रेममुख ठोंबरे,जिल्हा कार्याध्यक्ष निलेश कांडलकर,जिल्हा कोषाध्यक्ष पंकज दहीकर तालुकाध्यक्ष नितिन देशमुख,अमरावती अजयानंद पवार, अचलपूर मनिष येवले,अंजनगाव सुर्जी उमेश चुनकीकर, भातकुली ,संजय शेलोकार, चांदूर रेल्वे रत्नाकर पडोळे, चांदूर बाजार, रामदास भाग्यवंत, चिखलदरा, विनोद पाल, धारणी योगीराज मोहोड, धामणगाव रेल्वे,मोर्शी राजेश ठाकरे,छगन चौधरी, नांदगाव खंडेश्वर, सुनील बोकाडे, तिवसा जगदीश वानखडे, वरुड. तुळशीदास धांडे,दर्यापूर,तालुका सरचिटणीस चंद्रकांत कुरळकर,अमरावती, विजय सरोदे, अचलपूर विलास चौखंडे,अंजनगाव सुर्जी
संतोष राऊत,भातकुली धनंजय डांगे,चांदूर रेल्वे श्यामकांत तडस, चांदूर बाजार, प्रमोद ढाकूलकर, चिखलदरा, प्रफुल्ल शेंडे, धारणी, विवेक ठाकरे, धामणगाव रेल्वे, नंदकिशोर रायबोले, दर्यापूर, किशोर वैराळे, मोर्शी, गजानन कावलकर, नांदगाव खंडेश्वर राहूल वानखडे, तिवसा, विजय खोडस्कर, वरुड. महिला आघाडी तालुकाध्यक्ष लताताई टेंभरे, अमरावती,सरिताताई गाडगे, अचलपूर नम्रताताई लाडोले,अंजनगाव सुर्जी विनिताताई घुलक्षे,भातकुली
वंदनाताई बंड, चांदूर बाजार उज्वलाताई गुल्हाने, चांदूर रेल्वे,सविताताई ढाकरे, दर्यापूर ,रुपालीताई राऊत, मोर्शी, सुनिताताई लोणकर, नांदगाव खंडेश्वर सुचेताताई तायडे, तिवसा,सोनालीताई धोटे,वरुड.लिनताताई जावरकर, चिखलदरा अर्चनाताई गेडाम, धारणी रुपालीताई देशमुख, धामणगाव रेल्वे • विद्याताई कोथळकर, चांदूर बाजार पल्लवीताई निघोट,चांदूर रेल्वे, प्रणालीताई मालधुरे, चिखलदरा,जयश्रीताई खोबरे,धारणी सविताताई सुपटकर, धामणगाव रेल्वे महिला आघाडी सरचिटणीस स्वातीताई चव्हाण, अमरावती स्मिताताई मते, अचलपूर अश्विनीताई चोपडे, अंजनगाव सुर्जी ज्योत्स्नाताई शेटे,भातकुली
संगिताताई लाजूरकर, दर्यापूर,सविताताई पाचघरे, मोर्शी, छायाताई पोटेकर, नांदगाव खंडेश्वर,संध्याताई पाटील, तिवसा दिपालीताई मांडेकर,वरुड.तथा समस्त कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा-अमरावती यांनी केले आहे असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
म.रा.प्राथमिक शिक्षक समितीची अमरावती जिल्हा शाखेची नियोजन सभा.