पेसा क्षेत्रातील तात्पुरती कंत्राटी शिक्षक पद भरती
अमरावती जिल्ह्यातील १२० कंञाटी शिक्षक चार महिन्यांपासून मानधना शिवाय
प्राथमिक शिक्षक समितीचे शालेय शिक्षणमंञ्यांना निवेदन
कंञाटी शिक्षकांची अमरावती जि.प.वर धडक
मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपाञ यांना निवेदन
अमरावती दि.२० - शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक पुणे यांच्या आदेशाने पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये कोणत्याही संवर्गातील उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून आदेशानुसार अमरावती जिल्ह्यातील धारणी, मेळघाट, चिखलदरा या तालुक्यातील शाळांत १२० उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे. पेसा क्षेत्रात नियुक्ती दिलेल्या या कंत्राटी शिक्षकांना आदेशात नमूद केल्यानुसार दरमहा रु. २० हजार मानधन अनुज्ञेय आहे.मात्र सदर १२० कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपासून (सप्टेंबर २०२४) आजतागायत कोणतेही मानधन अदा करण्यात आले नाही. पेसा क्षेत्रातील दुर्गम भागातील शाळेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या १२० कंत्राटी शिक्षकांना मागील चार महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून मानधनापासून वंचित ठेवणे अनाकलनीय, अन्यायकारक आणि अमानवी असल्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ची ठाम धारणा आहे. या शिक्षकांनी अमरावती जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना मानधन मिळाले नाही असे संबंधित शिक्षकांनी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार व जिल्हा सरचिटणीस शैलेन्द्र दहातोंडे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपाञ व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदना व्दारे कळविले आहे.
या गंभीर बाबीची दखल घेऊन १२० कंत्राटी शिक्षकांचे मानधन त्वरित अदा होण्यासाठी आवश्यक निर्देश संबंधितांना देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शालेय शिक्षण मंत्री,शिक्षण राज्यमंत्री, प्रधान सचिव- शालेय शिक्षण, उपसचिव - शालेय शिक्षण, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक प्राथमिक,शिक्षण उपसंचालक प्राथमिक यांना निवेदना व्दारे केली आहे.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
कंञाटी शिक्षकांची अमरावती जि.प.धडक
नियुक्ती ही पेसा क्षेत्रातील प्राथमिक व पूर्व माध्यमिक जिल्हा परिषदेच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक म्हणून झाली आहे सदर शिक्षकांना जिल्हा परिषद अमरावती कार्यालय तर्फे ५ सप्टें २०२४ रोजी आदेश प्राप्त झाला व ते शाळेवर रुजू झालो असून आज पावेतो तब्बल ५ महिने होऊन गेले तरीही आम्हाला आमचे मासिक मानधन मिळाले नाही तरी माहे सप्टें, आक्टो, नोव्हे, डिसें. जानेवारी महिन्याचे एकत्रित मानधन
देण्याची मागणी केली आहे.
पेसा क्षेत्रातील दुर्गम व अतिदुर्गम आगात काम करत असतांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो,वेतन न मिळाल्यामुळे या शिक्षकांवर कर्जाचा डोंगर झाला आहे.तात्काळ वेतन मिळावे अशी मागणी कंञाटी शिक्षकांनी केली आहे.