ठाकरे शिवसेनेच्या वतीने कणकवली विधानसभेची उमेदवारी संदेश पारकर यांना जाहीर
Raju tapal
October 25, 2024
21
ठाकरे शिवसेनेच्या वतीने कणकवली विधानसभेची उमेदवारी संदेश पारकर यांना जाहीर
संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर होताच शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले निर्माण
कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे नितेश राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्या मध्ये रंगणार सामना
कणकवली:-ठाकरे शिवसेनेच्या वतीने कणकवली विधानसभेची उमेदवारी संदेश पारकर यांना जाहीर करण्यात आली आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच मातोश्री येथे संदेश पारकर यांच्या हाती एबी फॉर्म सोपवला आहे. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
त्यामुळे आता कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे नितेश राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्या लढत निश्चित झाली आहे. संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर होताच शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.पक्षात अनेक इच्छुक असल्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार? हा प्रश्न उपस्थित झाला होता.
अखेर शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देत अंतिम निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे नितेश राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात लढत निश्चित झाले आहे.
Share This