ठाणे येथे 3-4 फूट रस्ता खचला
Raju tapal
October 04, 2021
31
काल रात्री आठ ते नऊ च्या दरम्यान डी-मार्ट कॉर्पोरेट कार्यालय, सावरकर नगर नाका, वागळे इस्टेट, ठाणे (प). येथे 3-4 फूट रस्ता खचला. धोकादायक स्थिती निर्माण झाल्याने RDMC द्वारे तात्पुरते बॅरिकेटिंग केले. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी शिवसेना गटनेते स्थानिक नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी धाव घेतली. लवकरात रस्ता पूर्ववत करण्यास प्रशासनास आदेश देण्यात आले असून हा रस्ता ३५ ते ४० वर्ष जुना असून सदर रस्ता दुरुस्तीसाठी अलीकडेच मान्यता मिळालेली असून लवकरच हा रस्ता पुर्नवत व मजबूत होईल अशी माहिती बारटक्के यांनी दिली.
Share This