बाईक रॅलीने वेधले मतदारांचे लक्ष
Raju tapal
November 19, 2024
64
बाईक रॅलीने वेधले मतदारांचे लक्ष
मतदान जनजागृती : चांदूर रेल्वे स्वीप कक्षाचा उपक्रम
अमरावती/चांदूर रेल्वे/ प्रतिनिधी / दिनांक 19
दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यभर विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप कक्ष, पंचायत समिती चांदूर रेल्वे, जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता चांदूर रेल्वे शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही बाईक रॅली जिल्हा परिषद हायस्कूल येथून सुरुवात होऊन विरुळ चौक, इंदिरा नगर, राम नगर, साईनाथ कॉलनी, गाडगे बाबा मार्केट, कुऱ्हा रोड, स्टेट बँक चौक सिनेमा चौक, गांधी चौक, मेटे कॉलनी, पात्रिकर कॉलनी, डेपो, शिवाजी नगर ते जिल्हा परिषद हायस्कूल येथे जमा होऊन विसर्जित करण्यात आली.
या बाईक रॅलीमध्ये सहायक गटविकास अधिकारी संजय खारकर, स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांचेसह महिला व बालविकास अधिकारी वर्षा व्यवहारे, सहायक प्रशासन अधिकारी गजेंद्र पाटील, विस्तार अधिकारी विलास बाबरे, नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी उमेश बेहरे, गट समन्वयक मंगेश उल्हे, स्वीप कक्षाचे सदस्य सुधीर केणे, श्रीनाथ वानखडे, केंद्रप्रमुख राजेंद्र तामस्कर,सुरेश दामले, गणेश वासनकर, मुख्याध्यापक संघाचे प्रदीप तळोकर, उमेंद्र ढगे,अशोक मोटघरे ,प्रतिभा सहारे ,अर्चना भटकर, अतुल दामले, दिलीप ढोक, संजय ढोके ,संजय शेलोकार , वर्षा गादे, उज्वला गुल्हाने, श्रीराम जाधव, सुरेंद्र बकाले, कुणाल ठाकरे, अब्दुल करीम देशमुख, शेख गफ्फार, गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी आदीसह विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
स्वीप कक्षाचे विविधांगी उपक्रम:-
स्वीप कक्ष चांदूर रेल्वे द्वारा रांगोळी रेखाटन, पणती सजावट, फलक सजावट, आकाश कंदील निर्मिती, पाळीव पशू रंगरंगोटी, आठवडी बाजार मतदान जागृती, मतदान स्लीप वाटप, गाड्यांवर स्टिकरद्वारा जनजागृती, पथनाट्य, राष्ट्रसंताच्या टोपीद्वारा निवडणूक जनजागृती, पिंक फोर्स द्वारा जनजागृती, दिव्यांगद्वारा प्रात्यक्षिक जनजागृती आदी विविधांगी उपक्रम राबविले गेले. यासह चांदूर रेल्वे शहरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी म्हणून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
निवडणूक निरीक्षकांनी दाखविली हिरवी झेंडी:-
या भव्य बाईक रॅलीला तसेच केंद्रीय संचार ब्यूरो पुणे द्वारा निर्मित जनजागृती रथाला 36 धामणगाव विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निरीक्षक जी. बी. वसवा (भा.प्र.से) यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार अश्विनी जाधव, सहायक गटविकास अधिकारी संजय खारकर, स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे हे उपस्थित होते.
Share This