• Total Visitor ( 435187 )
News photo

रवींद्र वसंत पिंपळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न 

Raju tapal November 28, 2025 82

रवींद्र वसंत पिंपळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न 

राजू टपाल. 

टिटवाळा :- खडवली येथील भारतीय सैनिकी विद्यालयात काम करणारे रवींद्र वसंत पिंपळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. रवींद्र पिंपळे हे संस्थापक धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी स्थापित केलेल्या व विद्यमान अध्यक्ष जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शिवनिकेतन ट्रस्ट संचालित भारतीय सैनिकी विदयालय खडवली येथून ३१ ऑकटोबर रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्याचा सन्मान आणि सत्कार सोहळा रेजन्सी सर्वम् टिटवाळा येथे प्रशस्त दिमाखदार पद्धतीने पार पडला. रवींद्र वसंत पिंपळे व त्याच्या धर्मपत्नी सविता रविंद्र पिंपळे या दोघांच्या वाढदिवसाचे निमित्ताने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. रवींद्र पिंपळे यांनी आपल्या जिवनात आपल्या सम्यक वाणीमुळे अनेक नागरिकांशी त्यांनी ऋणानुबंध जोडले. पिंपळे या कुटुंबाचा परोपकारी स्वभाव, मितभाषी वाणी,मनात असलेली करुणा मैत्री,प्रत्येकाच्या मदतीला धाउन जाण्याची वृत्ती यामुळेच त्यांच्या सत्कार सोहळ्यास टिटवाळा शहरातील व पंचक्रोशीतील सर्व सामाजिक,धार्मिक,प्रशासकिय,शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर हया सत्कार समारंभास उपस्थित होते. टिटवाळा शहरातील सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी स्थानिक नगरसेवक यांनी त्यांचा सत्कार केला. पिंपळे यांची नाळ बुद्ध,शाहु,फुले,आंबेडकरी विचारांशी जुळलेली असल्यामुळे भारतीय बौद्ध महासभा टिटवाळा शहरातील सर्व शाख तक्षशिला,नालंदा,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती,बहुजन उत्थान समिती,जिव्हाळा ग्रुप,माता भिमाई,रिजेन्सी सर्वम् येथील सम्यक संबोधी प्रतिष्ठान,प्रबुद्ध प्रतिष्ठान,जेष्ठ नागरिक संघटना,श्री गणेश हाउसिंग सोसाइटी,धिंगाणा ग्रुप,खान्देश सेवा उत्कर्ष मंडळ इत्यादी संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व बौद्धांचार्य उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सुंदर आयोजन पिंपळे यांचे सुपुत्र प्रशांत रविंद्र पिंपळे यांनी केले होते. तर सुत्रसंचालन बौद्धाचार्य प्रकाश गायकवाड गुरुजी यांनी केले.रविंद्र पिंपळे यांनी या आनंदी क्षणाचे औचित्य साधून निसर्गावर प्रेम करणाऱ्या निसर्ग प्रेमी संस्था ध्येय निसर्ग संवर्धनाचा हया संस्थेस साठ फळांची झाडे दान करून संवर्धनास निधी दान केली. त्याचप्रमाणे आर्थिक दुर्बल गरीब दलित आणि आदिवासी मुलांसाठी काम करणारी संस्था आंबेडकरी चळवळीचे योगदान असलेली नाशिक इगतपुरी येथील बहिक्रुत हितकारणी सभेच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते 1957 ला स्थापन झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेस अकरा हजार एकशे अकरा रुपये निधी संस्थेचे अध्यक्ष रमेश गांगुर्डे आणि सचिव राजेंद्र जयप्रकाश डोळस यांच्याकडे निधी दान दिला. त्यामुळेच रवींद्र पिंपळे यांचा या जन्मावर,या जगण्यावर,शतदा प्रेम करावे या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी,इथल्या जगण्या साठीइथल्या पिंपळ पानावरती,अवघे विश्र्व तरावे. या जन्मावर, या जगण्यावर,शतदा प्रेम करावे या मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतील व्यक्तिमत्वावर तंतोतंत जुळते. सन्मान समारोह समारंभास अनेक मान्यवरांनी रविंद्र पिंपळे आणि सविताताई पिंपळे यांना भावी जीवन प्रवासाच्या सदिच्छा दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता केली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement