भोर येथे प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा संपन्न
विविध ठराव मंजुर
अमरावती - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणी सभा धांगेवाडी (भोर ) येथे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारला संपन्न झाली.
यावेळी राज्य स्तरावरील विविध विषयावर सांगोपांग झाली. मुख्यालय अट, संच मान्यता निकष, मंत्री महोदय ना. दादा भुसे यांनी बोलावलेल्या बैठकीतील मुद्दे, शा.पो.आ. धोरण व त्या अनुषंगाने होणाऱ्या शाळा भेटी, गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले जाणारे अनेकविध उपक्रम अशा अनेक प्रश्नांबाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. याशिवाय शालेय शिक्षण व ग्राम विकास विभागाच्या मंत्री महोदयांना शिक्षण क्षेत्राशी निगडित प्रश्नांबाबत संघटनात्मक भूमिका मांडण्यासाठी लवकरच बैठक लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभासद नोंदणी, संघटनात्मक बांधणी, श्रमिक कामगार कायद्याचे अंतर्गत संघटनात्मक हिशोब, कागदपत्रे व दप्तर अद्ययावत ठेवणे, मुदत संपलेल्या जिल्हा व तालुका शाखांची अधिवेशने आयोजित करुन संघटनात्मक पुनर्बांधणी करणे इत्यादी बाबतीत देखील ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी राज्य नेते उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य सल्लागार महादेव माळवदकर पाटील, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, राज्य उपाध्यक्ष आनंदराव कांदळकर, विलास कंटेकुरे, महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष वर्षाताई केनवडे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य तसेच विविध जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.