• Total Visitor ( 428070 )
News photo

वरळी डोम सभागृह खचाखच भरलं

Raju tapal July 05, 2025 79

वरळी डोम सभागृह खचाखच भरलं;

राज-उद्धव सभास्थळाकडे रवाना;

थोड्याच वेळात मेळाव्याला होणार सुरूवात 



मुंबई :- त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द केल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील डोममध्ये हा विजयी मेळावा होत आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू प्रदीर्घ कालावधीनंतर मंचावर एकत्र दिसणार आहेत. या ऐतिहासिक मेळाव्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. वरळीतील डोम गर्दीने खचाखच भरला आहे.



आज वरळीत होणाऱ्या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतील या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी पुणे, नाशिकसह इतर भागातूनही कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. काही वेळेतच मेळाव्याची सुरुवात होणार आहे. आजच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. आज मुंबईमध्ये विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. वरळी डोम येथे हा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात ठाकरे बंधू काय बोलणार? याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देखील या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement