यंदाची दिवाळी अनाथांसोबत .....
शिरूर येथील यशवंतराव चव्हाण सामाजिक,शैक्षणिक प्रतिष्ठान,डंबेनाला मित्र मंडळाचा उपक्रम
शिक्रापूर (प्रतिनिधी):- बदलत्या सामाजिक स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर यावेळची दिवाळी अनाथांसोबत साजरी करण्याचा संकल्प शिरूर येथील यशवंतराव चव्हाण सामाजिक, शैक्षणिक प्रतिष्ठान व डंबेनाला मित्रमंडळाने केला आहे.
दिवाळीच्या फराळासह फटाके,सुगंधी तेल,उटणे,साबन,नवीन कपडे दिवाळीसाठीच्या विविध वस्तूंची भेट अनाथांच्या संस्थांना देण्याचे नियोजन शिरूर येथील यशवंतराव चव्हाण सामाजिक,शैक्षणिक प्रतिष्ठान व डंबेनाला मित्रमंडळाने केले आहे असे स्व.यशवंतराव चव्हाण सामाजिक,शैक्षणिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर यांनी सांगितले. अनाथ संस्थांना देण्यासाठी फटाके,नवीन कपडे,सुगंधित तेल,उटणे,सुवासिक साबन,चप्पल,बूट या वस्तूंसह फराळाच्या पदार्थांसाठी लागणारे जिन्नस (कोरडा शिधा) आपण स्वेच्छेने जमा करू शकता.हे सर्व साहित्य एकत्र करून त्याचे शहर व परिसरातील अनाथ संस्थांमध्ये दिवाळीपूर्वी वाटप केले जाणार आहे. असे संजय बारवकर यांनी सांगितले. या पुण्यकर्मात सहभागी होण्यासाठीआपण आपली स्वेच्छा मदत वस्तू रूपाने संजय बारवकर पसायदान ९८२२७४३१६१, बाळासाहेब झाडगे साई श्रद्धा बेकरी ८६०० ५३२१६३, मुन्ना शेख ९८९००३१४१२, पोपटशेठ ओस्तवाल ९२२६७४३४१०,रूस्तम सय्यद ९७३०९१०३१३, कन्हैय्या दुगड प्रमोद मेडिकल ९२२५५२४८२०, मुद्दसर सौदागर ९८६०१३० ८८८,सतिश गवारी ९९६०४५५२७२, दत्ता अभंग ८५५२८२९१७३, संतोष शेजवळ ८८५७८७७८११,विशाल गांधी ७९७२९४९६९६,बाबाजी गलांडे ९८२२०९५८३१ यांच्याशी संपर्क साधून जमा करावी असे आवाहन संजय बारवकर यांनी केले आहे. साहित्य वाटप १७/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता मन:शांती छात्रालय ,बो-हाडेमळा याठिकाणी होणार असून आपण आपली स्वेच्छा मदत दि.१६/११/२०२५ संध्याकाळपर्यंत जमा करावी असे आवाहन श्री.संजय बारवकर यांनी केले आहे.