तिरूपती येथे बालाजी देवदर्शनाला गेलेल्या तिघांचा मृत्यू
विजय ढमढेरे
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या शेवगाव जि.अहिल्यानगर येथील तिघांचा मृत्यू कार उलटल्याने झाल्याची घटना घडली आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील महाविद्यालयीन युवक तिरूपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते.कारने गावी परतत असताना त्यांच्या कारला मंगळवारी अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील उरवकोंडा परिसरात कार पलटी होवून सौरभ विष्णू अकोलकर रा.हातगाव ता.शेवगाव, तुषार सुनील विखे रा.मिरी रोड, सोनविहार ता.शेवगाव, श्रीकांत थोरात विद्यानगर, शेवगाव या तिघांचा मृत्यू झाला.सुमित अकोलकर हा युवक या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
त्या भागातील स्थानिक भाषेतील वृत्तवाहिनीने या अपघाताचे वृत्त दिले असून "दैनिक लोकमत" अहिल्या नगर आवृत्ती वृत्तपत्राने या अपघाताच्या घटनेस प्रसिद्धी देवून दुजोरा दिला आहे.