टिप्पर व ट्रकची समोरासमोर धडक
Raju Tapal
October 27, 2021
37
टिप्पर व ट्रकची समोरासमोर धडक ; टिप्परचालक जागीच ठार
देऊळगाव मही शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील असोला फाट्यानजिक विना नंबरच्या टिप्परचा व ट्रकचा समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात टिप्परचालक जागीच ठार झाला. ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याने त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
असोला जहागीर फाट्याजवळ मंगळवार दि.२६ ऑक्टोबर ला सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अरूद रस्त्यामुळे ट्रक व टिप्परची समोरासमोर धडक झाली. या अपघातात टिप्परचालक प्रमोद जगन गाडेकर वय 40 रा.देऊळझरी ता.जाफराबाद हा जागीच ठार झाला. ट्रकचालक संतोष खुशाल गाऊत्रे रा.चंद्रपूर हा गंभीर जखमी झाल्याने गंभीर अवस्थेत त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक जयवंत सातव, पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे ,अधिकारी,कर्मचा-यांनी घटनास्थळावर जावून वाहतूक सुरळीत केली. टिप्परचालक केबिनमध्ये अडकलेल्या अवस्थेत असताना जेसीबीच्या साहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
स्थानिक ग्रामस्थ ओम प-हाड, दत्तू गायकवाड, भिकाजी निलख तसेच पत्रकारांनी मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.
Share This