टिटवाळयात शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉनचे आयोजन
सामाजिक,शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात विविध उपक्रम राबविणाऱ्या चेतना फाउंडेशनने टिटवाळ्यात येत्या रविवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी
6 वाजून 45 मिनिटांनी ते 8 वाजेपर्यंत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
सदरील मॅरेथॉनमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,शारीरिक मानसिक आरोग्यबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हा उद्देश संस्थेचा असून यामध्ये टिटवाळा परिसरातील शाळा सहभागी होणार असल्याचे चेतना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन नारायणकर यांनी सांगितले.