टिटवाळ्यातील रोशन अहिरे याचे युसिमास राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश
टिटवाळ्यातील रिजेन्सी सर्वम येथील ३२ नंबर बिल्डिंग मध्ये राहणारा व मेरिडियन शाळेत इयत्ता ६ वित शिकणारा रोशन अहिरे हा विद्यार्थी युसिमासच्या राष्ट्रीय स्पर्धे मध्ये घवघवीत यश मिळविले आहे.
युसीमासने आयोजित केलेल्या विसाव्या ऑनलाईन राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून तब्बल ७ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. टिटवाळ्यातील सीएसडी एज्युकेशनचा विद्यार्थी असलेल्या रोशन अहिरे याने १० मिनिटे वेळ दिलेला असताना साडे नऊ मिनिटांतच तब्बल २०० गणिते सोडवून विक्रम नोंदवला आहे.
युसीमासच्या वैशाली औटे मॅडम यांना त्याचा खूप अभिमान आहे.
रोशनने मिळवलेले हे प्राविण्य टिटवाळाकरांसाठी साठी खूपच प्रेरणादाई आहे. रोशनच्या हुशारीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
टिटवाळ्यातील युसीमास हि संस्था आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून युसीमासच्या अनेक विद्यार्थ्यांना याचा प्रत्यक्ष अनुभव येत असल्याचे युसीमासच्या वैशाली औटे यांनी सांगितले.