• Total Visitor ( 84940 )

ट्रॅक्टर व मोटरसायकलच्या अपघातात तांदूळवाडीच्या माजी सरपंचाचा मृत्यू

Raju Tapal December 05, 2021 32

ट्रॅक्टर व मोटरसायकलच्या अपघातात तांदूळवाडीच्या माजी सरपंचाचा मृत्यू

       

 ट्रॅक्टर व मोटरसायकलच्या अपघातात तांदूळवाडीच्या माजी सरपंच बेबीताई सूर्यभान म्हसे वय - ५८ वर्षे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

ऊसाने भरलेला ट्रॅक्टर शनिवारी दुपारच्या वेळी राहुरीच्या दिशेने चालला असता तांदूळवाडी जि.अहमदनगर येथील माजी सरपंच बेबीताई म्हसे नातवासोबत मोटरसायकलवर घराकडे जात असताना मांजरी रोडवरील रेल्वे स्टेशन गेटच्या वळणावर  मोटरसायकलचा तोल जावून खाली पडल्या.

त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने माजी सरपंच बेबीताई म्हसे गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्यांचा मृत्यू झाला.

अपघातातील दुस-या घटनेत मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या पुणे - इंदौर प्रवासी बसचा रॉड तुटल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना घडली.

या बसमध्ये सुमारे २५ ते ३० प्रवासी होते. 

अपघातस्थळाजवळ असलेल्या तांबेवस्तीवरील तरूणांनी मदतीसाठी मोठी धावपळ करून बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले.

१०८ ऍम्ब्युलन्स चालक ज्ञानेश्वर थोरात यांनी तातडीने औषधोपचाराची गरज असणा-या प्रवाशांना राहाता येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Share This

titwala-news

Advertisement