त्रिरश्मी बुद्ध लेणी आणि स्तुप , धम्मप्रसारक बहुऊदेशिय संस्था जि.नाशिक या सामाजिक संस्थेच्या वतीने त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील स्मारक या ठिकाणी ६५ व्या बौद्ध धम्म दिक्षा दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी संस्थेच्या वतीने धम्म ध्यजारोहण स्थानिक नगरसेविका दिक्षाताई लोढे व नगरसेवक भगवान दोंदे तसेच कृती समितीचे वामन दादा गायकवाड,वामन पवार, बाळासाहेब शिदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भंन्ते सुगत व यू नागधमो , धम्म रखित भंन्ते यांनी ध्वजगाथा घेतली. त्रिरश्मी बुद्ध लेणी स्तुप याठिकाणी समितीच्या वतीने स्मारकामधे बौद्ध बाधंवाच्या उपस्थित बाळासाहेब शिदे जितेश शार्दुल,अरुण शेजवळ यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापुजन व बुद्ध रुपाचे पुजन करण्यात आले यावेळी वामण पवार विपश्यना साधक यानी त्रिशरण पंचशील गाथा घेतली तसेच भिमस्तुती व सरणेत्ये घेण्यात आले. यानंतर प्रदिप लबडे व मित्रमंडळ यानी उपासकासाठी अन्नदानाचा कार्यक्रम केला. या ठिकाणी समितीच्या वतीने शुभेच्छा पत्रक व विविध सुविधांचा अभावावर प्रकाशजोत टाकणारे पत्रकाचे वाटप शीलाताई पाटील , कल्पना तपासे ,राजश्री शेजवळ,वामन पवार, मंदाकिनी दाणी,शैलाताई उघडे, अरुण शेजवळ यांनी केले, यावेळी अरुण शेजवळ जितेश शार्दुल, बाळासाहेब शिदे ,वामण पवार,युवराज शिदे , यांनी बौद्ध बाधंवाना धम्म दिक्षा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केली.