• Total Visitor ( 368998 )
News photo

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू  

Raju tapal July 23, 2025 60

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू  



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील जराडवाडी येथे घडली.

शरदनाना दत्तात्रय मोरे वय - ३६ रा‌.सोनवडी सुपे ता‌.बारामती, ज्ञानेश्वर बबन वलेकर वय - ४२ रा‌.दहीगाव ता‌.माळशिरस जि.सोलापूर अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोघा दुचाकीस्वारांची नावे आहेत.

रविवार दि. २० जुलैला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम पालखी महामार्गावर जराडवाडी हद्दीतील ८ व्या मैलाजवळ बारामतीच्या दिशेने निघालेल्या हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच ४२ व्ही ३२१९ व बारामतीहून पाटसकडे निघालेल्या होंडा कंपनीची अॅक्टिव्हा एम एच १४ जे जी ९२०६ या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला तर अक्कामाई ज्ञानेश्वर वलेकर वय - ३९ या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे समजले.

              


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement