यवत येथील अपघातात दोघांचा मृत्यू
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- स्विफ्ट कारने डिव्हायडर तोडून डिझायर कारला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पुणे -सोलापूर महामार्गावर यवत येथे मंगळवारी दि.२० आॅगस्टला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
अशोक विश्वनाथ थोरबोले वय -५७ रा.उरूळीकांचन मूळ रा.गोजवडा,जि.धाराशिव,गणेश धनंजय दोरगे वय -२८ रा.रायबाची वाडी ता.दौंड अशी अपघातातील मृतांची नावे असून ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले,रा.उरूळीकांचन ,राकेश मारूती भोसले रा.बोरीभडक ता.दौंड, सचिन रमेश दोरगे रा.यवत, वैभव रमेश दोरगे रा.यवत, ऋषिकेश बाळासाहेब जगताप अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
ज्ञानेश्वर थोरबोले यांनी या अपघाताची तक्रार यवत पोलीस स्टेशनमध्ये दिली.
या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनुसार,यवत गावाजवळील शेरू हाॅटेलसमोरील महामार्गावर एम एच १२ वाय डब्ल्यू ५०५२ या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने भरधाव वेगात डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या एम एच १२ टी वाय ७५३१ या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिली. या अपघातात एम एच १२ एन यू ५५०१ या क्रमांकाच्या वाहनालाही धडक बसून मोठे नुकसान झाल्याचे समजते.
राकेश मारूती भोसले या चालकाविरूद्ध अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.