दोन महिला चालवतात फरलव्ह पेट रिसॉर्ट व डॉग ट्रेनिंग सेंटर
जालना– आज स्त्रियांनी जवळपास प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे. अशाच एका अनोख्या आणि पुरुषप्रधान क्षेत्रात आपला ठसा फक्त गाव किंवा राज्यापुरता न उमटवता देशस्तरावर उमटवणार्या दोन महिला मृगनयनी राजे व गितांजली देशमुख हया (इल्ीत्ल्न्) फरलव्ह पेट रिसॉर्ट व डॉग ट्रेनिंग सेंटर चालवत आहेत.
जालना येथील देऊळगावराजा रोड, धावेडी येथे फरलव्ह डॉग ट्रेनिंग सेंटर हे मराठवाडयातील सर्वात मोठे श्वानकेंद्र असून येथे श्वानांचे ट्रेनिंग, बोर्डीग व ग्रुमिंग केले जाते. हयाच सोबत येथे पेटींग झू देखील आहे. शालेय सहली, मुलांचे वाढदिवस विविध फेस्टीवल इव्हेंट आणि बरेच काही येथे आयोजित करण्यात येतात. येथे सर्व प्रजातींच्या व विविध वयोगटातील श्वानांना प्रशिक्षण दिले जाते. एक एकरात विस्तारलेल्या निसर्गरम्य परिसरात फरलव्ह येथे इनडोअर व आऊटडोअर केनल, डॉगपार्क, प्ले एरिया अशा विविध सुविधा येथे उपलब्ध आहेत. येथे प्रशिक्षण झालेल्या बेल्झीयन, मॅलिनॉईस प्रजातीच्या अकिरा नामक श्वानांने नामांकित ÂDU²-ÂE ही स्पर्धा जिंकून मराठवाडयातील पहिला प्रोटेक्शन डॉग होण्याचा मान मिळविला आहे. चुकीच्या समजुतीमधुन आक्रमक झालेले श्वान जसे रॉटव्हिलर, जर्मन शेफर्ड यासारख्या प्रजातीच्या श्वानांना देखील येथे महिला प्रशिक्षण/ट्रेन करतात, जेणे करुन त्या श्वानांचे व त्यांच्या मालकांचे पुढील आयुष्य सोपे व सुखकर व्हावे. फरलव्ह येथे श्वान प्रशिक्षण हे पुर्णपणे सकारात्मक व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विकारल्या गेलेल्या पध्दतीने केले जाते. श्वांनाच्या प्रशिक्षणांसोबतच त्यांच्या मालकांना देखील श्वान हाताळायचे प्रशिक्षण दिले जाते. व त्यांना मार्गदर्शन केले जाते. ज्यामुळे फरलव्ह येथे संपुर्ण महाराष्ट्रातून श्वानप्रेमींचा वाढता कल दिसून येतो. फरलव्ह येथील प्रशिक्षीत थेरपी डॉग्ज हे येथे येणार्या प्रत्येकांसाठी खास आकर्षण ठरतात. फरलव्हच्या दोन्ही डायरेक्टर अतिशय जिद्यीने व कर्तव्य तत्परतेने हा कठीण समजला जाणारा व्यवसाय (जॉब) पार पाडत आहेत. त्यांच्या हया प्राणीप्रेमासाठी खुप शुभेच्छा.. वैज्ञानिक अभ्यास सांगतो की, श्वानांसोबत तसेच इतर पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवल्याने आपले शारीरीक, भावनिक व मानसीक स्वास्थ सुधारते, तेव्हा तुम्ही कधी येताय फरलव्हला भेट द्यायला?.