ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तळेगाव ढमढेरे येथील दोन युवक गंभीर जखमी
शिरूर:- समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत जेजुरी उरूळी कांचन रस्त्यावर घडली.
सार्थक विजय ढमढेरे वय- २० वर्षं,प्रणव संभाजी ढमढेरे वय -२० वर्षे अशी अपघातातील दोघा गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.सार्थक ढमढेरे,प्रणव ढमढेरे हे त्यांच्या आणखी एका मित्रासमवेत पुरंदर तालुक्यातील श्री.क्षेत्र नारायणपूर येथे देवदर्शन करण्यासाठी दुचाकीवर गेले होते.देवदर्शन करून संध्याकाळी उशिरा नारायणपूरहून घरी तळेगाव ढमढेरेकडे परतत असताना शिंदवणे घाटात पुढे वाकवस्ती परिसरात आले असताना उरूळी कांचननहून जेजुरीकडे भरधाव वेगातील ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरूणाने उडी मारली.ट्रकचालकाने दुचाकी १०० ते १२५ फूट फरफटत नेल्याचे समजले या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकांना पुण्यातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. उरूळी कांचन पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार उद्धव गायकवाड यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.