देवगड पुरळ येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांचा भाजपात प्रवेश
पालकमंत्री ना. नीतेश राणे यांच्या वाढदिनी उबाठाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे गिफ्ट
पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले सर्वाचे स्वागत
कणकवली :- देवगड - पुरळ येथील उबाठा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना.नितेश राणे यांना वाढदिनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत अनोखे गिफ्ट दिले आहे. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत असतानाच हा पक्ष प्रवेश झाला. यामध्ये मंगेश घाडी,उमेश डोंगरकर,नंदकुमार विलकर,जयप्रकाश पुजारे,मंगेश पुजारे,सागर तांबे, अक्षय विलकर,श्रेयस डोंगरकर,नामदेव मूळम,प्रथमेश देवळेकर आदींनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.
उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांचा भाजपात प्रवेश
पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी केले स्वागत
कणकवली - उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुका प्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांनी पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसादिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पार्टी पक्षात स्वागत केले. यावेळी निसार शेख,यासिन शेख,शानु शहा,आदिल शेख,तौसिफ शेख,सलमान शेख आदी उपस्थित होते.