• Total Visitor ( 84393 )

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Raju tapal December 18, 2024 41


उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट 
आदित्य ठाकरेही होते उपस्थित

विरोधी पक्षनेते पद मिळणार का?

महाराष्ट्रात पुन्हा घडणार का राजकीय भूकंप?
उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री फडणवीस भेटीने चर्चेला उधाण

एकमेकांना टीकेचे बाण सोडण्याची एकही संधी न दवडणाऱ्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन बड्या नेत्यांची आज अनेक दिवसांनी भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे.

नागपूर :-(आबा खवणेकर):-गेल्या पाच वर्षात बदलेली राजकीय समीकरणं पाहता महाराष्ट्रात कधीही काहीही घडू शकतं. त्यामुळेच आता पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याची चर्चा रंगू लागलीय. त्याला कारणही तसंच आहे.नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात दाखल झाले. सर्वांना वाटलं की ते सर्वात आधी आपल्या मविआतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार. मात्र त्यांनी थेट कट्टर राजकीय शत्रू असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाची केबिन गाठली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

खातेवाटपावरून शिंदे गट नाराज आहे. त्यात अनेक दिवस शिंदे आणि फडणवीसांमध्ये संवाद तुटला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या फडणवीसांच्या या अचानक भेटीमुळे पुन्हा नवी समीकरणं जुळण्याबाबत चर्चा रंगली. उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा यापूर्वीही रंगली आहे. मात्र यावेळी भाजप आणि शिंदे गटात खाते वाटपावरून टोकाचे संबंध ताणले गेले असून सारंकाही आलबेल नसल्याचं दिसतंय. त्यातच ऐन अधिवेशनात ठाकरेंनी सर्वात आधी भेट घेतली ती फडणवीसांची त्यामुळे भाजप आणि ठाकरे गट पुन्हा टाळी देणार का आणि राज्यात पुन्हा या पंचवार्षिक योजनेत नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळणार का याबाबत महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला उत्सुकता आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी पहिली भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. यासोबतच त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याशी चर्चा केली.उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटायला आले तेव्हा आदित्य ठाकरे आणि वरळीतून विजयी झालेले वरुण सरदेसाई यांच्याशिवाय माजी मंत्री आणि आमदार अनिल परब उपस्थित होते. फडणवीस यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली.नार्वेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात केली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधिमंडळात पोहोचले, तिथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राज्यातील राजकीय तापले आहे. त्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.तर मंत्रिमंळातील काही ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आल्यामुळे नाराजीचा सूरही आहे. ही नाराजी दूर होत नाही तोच उद्धव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही केवळ सदिच्छा भेट होती असे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा फडणवीस यांनी उद्धव यांना फोन केला होता. त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. मात्र, उद्धव ठाकरे फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत. ठाकरे यांनी फोनवरच त्यांचे अभिनंदन केले होते.

नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. विधानसभा विरोधी पक्षनेत्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर, ही दोघांमधली पहिलीच भेट ठरली आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे देखील आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ही दुसरी अचानक झालेली भेट आहे. याआधी विधान परिषद निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानसभेत एकाच लिफ्टमध्ये गाठभेट झाली होती. त्यावेळीही राज्यात चर्चांना उधाण आलं होतं.विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला न भुतो न भविष्यती विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबई येथे पार पडला. या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून निमंत्रण दिले होते. मात्र विरोधकांमधून कोणताही नेता या सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. मात्र उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील अनेक नेते शपथविधीला हजर राहिले नाहीत. यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्याशी न बोलता निघून गेले?

अशातच, मविआत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेण्याचे उद्धव ठाकरे यांनी टाळले असल्याचे चित्र आज बघायला मिळाले आहे. नाना पटोले यांच्या समोरून उद्धव ठाकरे विधिमंडळातून बाहेर पडले. मात्र उद्धव ठाकरेंनी नाना पटोले यांच्याशी न बोलता निघून गेले. नाना पटोले विधिमंडळाच्या पक्ष कार्यालयासमोर उभे होते. दरम्यान, 10 फूट अंतरावरून उद्धव ठाकरे विधिमंडळातून बाहेर पडले. मात्र ही भेट अनावधानाने टळली की मुद्दाम हे झाले, याची चर्चा आता रंगू लागली आहे. आज सभागृहात पण काँग्रेसच्या सभात्याग वेळी ठाकरे गटाचे आमदार सभागृहात थांबले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत सारे आलबेल तर नाही ना, असेही बोलल्या जात आहे.

काँग्रेसने सावरकर आणि भाजपने नेहरूंबद्दल बोलणे सोडायला हवे, मोदींनी नेहरू यांचे रडगाणे बंद करावी, तर काँग्रेसने सावरकरांवर बोलणे सोडावे. मुळात भाजपने सावरकर यांना भारत रत्न का जाहीर केला नाही? फडणवीस यांना अनेक वेळा पत्र दिले, मग अजून मान्यता का मिळाली नाही? स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे आपापल्या जागी आहेत. आता आपण काय करणार आहोत हे लोकांना दाखवलं पाहिजे. मुळात सावरकरांना भारतीय जनता पक्ष भारतरत्न का देत नाही? त्यांची हरकत काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळेस उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सभागृहात उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, सावरकरांवरून उद्धव ठाकरेंनी मित्रपक्ष काँग्रेसला दिलेल्या सल्लावर काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाली की, सध्या वर्तमानच धोक्यात आहे. त्यामुळे आम्हाला भूतकाळातल्या घटनेवर बोलायचे नाही. आमच्यासाठी परभणी, बीड, शेतकऱ्यांचे विषय महत्वाचे आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला जो सल्ला दिला त्यावर मी काही वक्तव्य करणार नाही. असे म्हणत नाना पटोले यांनी अधिक बोलणे टाळले आहे.

उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात पोहोचले. आपल्या हातातील बुके देऊन फडणवीसांचे अभिनंदनही केले.त्यानंतर, हात जोडून ते निघाले असता देवेंद्र फडणवीसांनी या बसा.. असे म्हणत बसण्याचा आग्रह केला. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी देखील खाली बसून त्यांच्यासोबत चर्चा केली. या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, सोप्यावर बसून दोन्ही नेते चर्चा करताना दिसत आहेत. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनस्थळी आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती दिसून आली. त्यामुळे, ठाकरे-फडणवीस भेटीने शिंदे व अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.दरम्यान, ही सदिच्छा भेट होती, दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करण्यासाठीची ही भेट होती, असे सांगण्यात आले. ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकलीय. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आल ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. महाराष्ट्र हितासाठी आणि देशाच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत एक पाऊल पुढे टाकले आहे. भलेही आम्ही विरोधी पक्षात आहोत, ते सत्ताधारी पक्षात आहेत. असे असले तरी आम्ही सारे जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ईव्हीएमबद्दल आम्हाला संशय आहेच. 76 लाख मतं कशी वाढली हा प्रश्न आहेच. हे मुद्दे आहेतच. पण राज्याचा विकास झाला पाहिजे अशी आमची भुमिका आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
 

Share This

titwala-news

Advertisement